बारामतीत मद्यपी महिलांवर कारवाई

बारामती, 8 मेः बारामती शहरातील गणेश मार्केट परिसरामध्ये अनेक महिला गल्ली बोळामध्ये उभे असतात. सदर महिला दारू पिऊन उभ्या असतात. त्या ठिकाणी या महिला आरडाओरडा करत असतात. तसेच सदर भागात अवैध व्यवसाय करत असतात. तीन महिन्यापूर्वी त्याठिकाणी छापा मारून पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार अधिनियमाप्रमाणे चार महिलांना अटक केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी बर्‍यापैकी महिला येणं बंद झाले होते. परंतु सदर भागात असे प्रकार पुन्हा चालू झाल्याची तक्रार स्थानिक व्यापारी, पत्रकारांनी पोलिस ठाण्यात केल्या आहेत.

काल, शनिवारी 7 मे रोजी मंत्री महोदयांचा दौरा संपल्यानंतर पोलीस दल गाफील असेल अशा भावात त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन महिला दारू पिऊन रस्त्यावर आरडाओरडा करत होत्या. त्यावेळेस तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवलदार सचिन वाघ, महिला पोलीस कर्मचारी काजडे-जमदाडे, पोलीस नाईक जाधव, पोलीस हवालदार यशवंत पवार, दशरथ कोळेकर यांच्या टीमने पायी मार्केट भागात गस्त केली. सदर महिलांना शोधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

सदर महिलांनी दारू पिलेल्या होत्या. या महिलांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. यापुढे महिला अवैध दारू धंदा किंवा अवैध मानवी व्यापार करत असतील, तर त्यासाठी महिला पोलीस हवालदार पवार, गलांडे, जमदाडे, धुमाळ, साबळे यांचे पथक तयार करण्यात आले आहे. तसेच अशा महिलांवर यापुढे सतत कारवाई होणार आहे. तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथक सुद्धा याच कामासाठी नेमण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *