एक्झिट पोल्स नुसार देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्याचा अंदाज!

दिल्ली, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान पार पडले. या मतदानानंतर काही खाजगी टीव्ही वृत्तवाहिन्या आणि इतर एजन्सींनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. या आकड्यानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 350 हून जागा मिळणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तसेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत 125 ते 150 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. हा निकाल लागल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.

पाहा विविध एक्झिट पोलचे आकडे –

इंडिया टुडे- माय ॲक्सिस इंडियाच्या एक्झिट पोल नुसार, एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा आणि इतरांना 8 ते 20 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इंडिया टीव्ही- सीएनएक्स एक्झिट पोलनुसार, एनडीएला 371 ते 401 जागा आणि इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळतील. इतरांना 28 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज 24 टूडे- चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार, एनडीएला 400 जागा, तर इंडिया आघाडीला 107 जागा मिळतील आणि इतरांना 36 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रिपब्लिक इंडिया- एक्झिट पोल नुसार, एनडीएला 353 ते 368 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा जिंकण्याचा अंदाज असल्याचे त्यात म्हटले आहे. इतर उमेदवारांना 43 ते 48 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
एबीपी न्यूज- सी वोटर च्या एक्झिट पोल नुसार, एनडीएला 353 ते 383 जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळतील, तर इतरांना 4 ते 12 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इंडिया न्यूज- डी डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 371 जागा मिळण्याची शक्यता आहे; इंडिया आघाडीला 125 जागा आणि इतर 47 जागा मिळू शकतात.
जन की बात- एक्झिट पोलनुसार, एनडीएला 362 ते 392 जागा, इंडिया आघाडीला 141 ते 161 आणि इतरांना 10 ते 20 जागा मिळतील, अशी शक्यता आहे.
न्यूज नेशन- एक्झिट पोलने एनडीएला 342 ते 378 जागा मिळतील, इंडिया आघाडीला 153 ते 169 जागा मिळतील आणि इतरांना 21 ते 23 जगा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
एनडीटीव्ही- पोल ऑफ पोल च्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 365 जागा, इंडिया आघाडीला 146 जागा आणि इतरांना 32 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
दैनिक भास्कर- एक्झिट पोल मध्ये एनडीएला 281 ते 350 जागा, इंडिया आघाडीला 145 ते 201 जागा आणि इतरांना 33 ते 49 जागांचा अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *