राजस्थान/नागौर, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राजस्थानमधील नागौर येथे आज एक भीषण अपघात झाला. याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या घटनेत 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 3 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी जात होते. तसेच हे पोलीस कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षा रक्षक म्हणून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांची आज राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील तारानगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. याच सभेच्या निवडणूक ड्युटीसाठी हे सर्व पोलीस कर्मचारी गाडीतून जात होते.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विजेतेपदासाठी सामना
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात जात असलेली त्यांची कार एका ट्रकला धडकली. कनुता या गावाजवळ रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाला. यात 6 पोलीस कर्मचारी मारले गेले, तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना नागौरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले
दरम्यान या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून या अपघातातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. “आज पहाटे चुरूच्या सुजानगढ सदर भागात एका वाहन अपघातात पोलिसांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व पोलिसांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे.” असे अशोक गेहलोत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
2 Comments on “नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांचा अपघाती मृत्यू”