ओडिशा, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यात तारिणी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या वाहनाची एका ट्रकला धडक बसली. या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. या घटनेत मिनीबसच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
छगन भुजबळ यांना धमकीचे मेसेज; गुन्हा दाखल
दरम्यान, एका व्हॅनमधून ओडिसाच्या गंजम जिल्ह्यातील पुडामरी या गावातील 20 जण आज पहाटेच्या सुमारास तारिणी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी घाटगाव येथील बळीजोडी गावाजवळील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या व्हॅनने पाठीमागून धडक दिली. या अपघातात 3 महिला आणि एका मुलासह 8 जण ठार झाले आणि 12 जण जखमी झाले. मंदिरापासून अवघ्या 3 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली.
गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागला
जखमींना क्योंझर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यांतील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कटक येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर या अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सविस्तर चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
One Comment on “देवदर्शनासाठी जात असलेल्या 8 भाविकांचा अपघाती मृत्यू”