ताम्हिणी घाटात एका ट्रॅव्हल्स बसचा अपघात; 2 ठार 55 जखमी

माणगाव, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रायगड जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात ट्रॅव्हल्स बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 55 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. मात्र, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, ही ट्रॅव्हल्स बस पुण्यातून कोकणात जात असल्याची माहिती समोर आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1740940329581465767?s=19



या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. ताम्हिणी घाट परिसरात ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्याची बातमी कळताच, पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना या बसच्या बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. यांतील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ताम्हिणी घाटात यापूर्वी अनेकदा गाड्यांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *