खासगी बस आणि कंटेनरचा अपघात, 23 प्रवासी जखमी

पुणे, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका खासगी बस आणि कंटेनर ट्रकची धडक झाली. या अपघातात 23 जण जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ गुरूवारी (दि.17) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले.

https://x.com/ANI/status/1846889181546414310?t=yhxRl0C3VR9EqtlT5L1NOg&s=19



हा अपघात इतका गंभीर होता की त्यामुळे या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही बस आज सकाळी कोल्हापूरहून मुंबईतील बोरिवलीकडे जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. ही बस मोठ्या कंटेनर किंवा ट्रेलरला धडकली असण्याची शक्यता आहे. या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.



दरम्यान बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, या अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताचा तपास सध्या पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *