आमदार दत्तात्रय भरणे यांची शिवीगाळ! रोहित पवारांकडून व्हिडिओ शेयर

दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड

इंदापूर, 07 मे: राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत असताना इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दत्तात्रय भरणे हे एका व्यक्तीला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दत्तात्रय भरणे यांचा हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट केला आहे.

रोहित पवारांचे ट्विट 

या व्हिडिओत दत्तात्रय भरणे यांनी आमच्या पक्षाच्या एका बूथ कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

तत्पूर्वी, दत्तात्रय भरणे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, दत्तात्रय भरणे यांचा हा व्हिडिओ कधीचा आहे. हे अजून कळलेले नाही. त्यामुळे त्यांनी शिवीगाळ का केली? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. या व्हिडिओमुळे दत्तात्रय भरणे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दत्तात्रय भरणे यांनी या व्हिडिओ संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मी दोघांमधील भांडण सोडवत होतो, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *