बानपकडून सातवांना अभय आणि गरिबांना भय!

बारामती, 25 जानेवारीः बारामती शहरातील महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा.लि. कार शोरूम बेकायदा बांधकामाला नगरपरिषदेचे अभय असल्याचे दिसून येत आहे. मिळकत क्रमांक 13122002656 यामध्ये अनाधिकृत बांधकामाची कबुली कर विभाग प्रमुख महेश आगवणे यांनी दिली आहे. परंतु सदर बांधकामावर शास्ती लावण्यास असमर्थता दर्शविली आहे किंवा 30 फुटी चार रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमण काढण्यास बारामती नगरपरिषद दजवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 100 टक्के निकाल

सदरच्या रस्त्यावरती शोरूमचे अनधिकृत बांधकाम करून पूर्ण रस्ता बंद केला आहे. अकृषिक वापर, आदेश क्रमांक जमीन/कावी/1176/2008 दिनांक 23/5/2008 नुसार सदर जमिनीत वाणिज्य व रहिवासी परवानगी मिळाली. परंतु सदर परवानगीच्या अटी व शर्ती भंग करून 30 फुटी रस्त्यावरती वहिवाट्यास मज्जाव करून अनाधिकृत बांधकाम केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

बारामतीत विवाहितेला लाकडी दांडक्याने मारहाण

शोरूमच्या पाठीमागे राहत असणाऱ्या लोकवस्तीचे अतोअत हाल होत असतानाही अतिक्रमण विभाग रस्ता खुला करण्यासाठी भीती वाटत आहे, याचे आश्चर्य व्यक्त होताना दिसून येत आहे.
आज बारामती नगरपरिषद अतिक्रमण विभागाने बारामती एमआयडीसी रोडला रस्त्याच्या कडेला बसलेले फळ, भाजीपाला विक्रेते हातगाडीवाले यांना धनाधन उडवून लावले. हातावरचे पोट असणारे लोक सयरभय झाल्याचे आमचे प्रतिनिधी सम्राट गायकवाड व अभिजीत कांबळे यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर 30 फुटाचा रस्ता गिळूनकृत करणाऱ्या शोरूम मालकावर काय कारवाई करणार? हे काळच ठरवेल.

One Comment on “बानपकडून सातवांना अभय आणि गरिबांना भय!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *