इंदापूर, 8 ऑक्टोबरः इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे आज, (शनिवारी) 8 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 च्या सुमारास मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेसह समविचारी पक्ष, संघटना आणि संस्थेच्या वतीने आधार आणि एल्गार सभा संपन्न झाली. सदर सभा सुरज वनसाळे यांच्या नेतृत्वात पार पडली.
सोमेश्वर, मुर्टी या गावांना पावसाने झोडपले
दरम्यान, ही सभा होऊ नये म्हणून 7 ऑक्टोबर च्या रात्रीपासूनच काही पोलीस अधिकारी, तथाकथिक कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच सकाळपासूनच पोलीस अधिकारी घरी बसून होते. या सर्व प्रेशरला न झुगारता सुरज वनसाळे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेली आधार व एल्गार सभा दणक्यात झाली.
या सभेचा उद्देश पिडीत कुटुंबाचे मनोबल वाढवणे, गावातील मागासवर्गीय लोकांचे मनोबल वाढवणे, जातीय सलोखा राखणे, खोटे क्रॉस गुन्हे काढण्यासाठी भाग पाडणे व अॅट्रोसिटी अॅक्टची कडक अंमलबजावणी करणे हा होता.
या सभेवेळी ग्रामस्थ, इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमधील लोक, आसपासच्या तालुक्यातील लोक तसेच समविचारी पक्ष, संघटना, संस्थांचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, बौद्ध युवकांना बेदम मारहाण करुन त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले होते. या सभेच्या प्रसंगी वरीष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.