बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका मॉडेल तरूणाला अटक

मुंबई, 11 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई पोलिसांनी मॉडेल आणि कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका तरूणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. त्याच्याकडे पिस्तुलाचा परवाना नव्हता. त्यानंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

https://x.com/ANI/status/1822287662172065838?s=19

1 पिस्तूल, 14 काडतुसे सापडले

हा अटक केलेला 24 वर्षीय तरूण असून तो मॉडेल आणि कलाकार म्हणून काम करीत आहे. त्याने टीव्ही मालिकांमध्येही काम केले असल्याचे सांगितले जात आहे. हा तरूण बोरिवली रेल्वे स्थानकावर संशयास्पद रित्या ट्रॉली ओढून नेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला बॅग दाखविण्यास सांगितले. परंतु, त्याने बॅग तपासण्यास नकार दिल्याने त्याच्यावरील संशय अधिक बळावला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या सामानाची तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे सापडले.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी याबाबत त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे या पिस्तुलाचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या 24 वर्षीय तरूणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. तेंव्हा कोर्टाने या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *