कारच्या धडकेत जखमी झालेल्या तरूणाचा सात दिवसांनी मृत्यू, ड्रायव्हर अटकेत

मुंबई, 29 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत भरधाव कारने धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या 28 वर्षीय तरूणाचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे. 20 जुलै रोजी मुंबईतील वरळी सी लिंकजवळ अब्दुल गफ्फार खान रोडवर या तरूणाला एका कारने धडक दिली होती. या अपघातात तो जखमी झाला होता. परंतू, 27 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोद लाड असे या मृत तरूणाचे नाव आहे.

https://x.com/ANI/status/1817748396981244099?s=19

20 जुलै रोजी अपघात झाला होता

याप्रकरणी कारचालक किरण इंदुलकर याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, अपघातातील ही आलिशान कार एका व्यावसायिकाची असल्याची चर्चा आहे. विनोद लाड हा तरूण 20 जुलै रोजी वरळी सी लिंकजवळ अब्दुल गफ्फार खान रोडववरून दुचाकी चालवत घरी येत होता. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या या बीएमडब्ल्यू कारने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. या धडकेमुळे तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या उपचारादरम्यान डॉक्टरांनी विनोदला 27 जुलै रोजी मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात संबंधित कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

याआधी ही झाला होता अपघात

तर याच्याआधी वरळीत ‘एक हिट अँड रन’ चे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी 9 जुलै रोजी वरळीतील ॲनी बेझंट रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यूने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात कावेरी नाखवा नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी मिहीर शाह याच्यासह त्याचे वडील आणि ड्रायव्हर यांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *