पुण्यात पोलिसांचा लाठीचार्जचा व्हिडीओ आला समोर

पुणे, 24 ऑक्टोबरः ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर 23 ऑक्टोबर 2022 रोजी टी 20 वर्ल्ड कपचा भारत आणि पाकिस्तानचा पहिला सामना खेळविण्यात आला. या सामान्यात भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून रोमांचक विजय मिळविला. या विजयानंतर देशभरात विजय जल्लोष साजरा करण्यात आला. विजयानंतर अतिउत्साही क्रिकेट प्रेमी पुण्यातील फर्ग्युसन मार्गवरील गुडलक गुडलक चौकात एकत्र येत जल्लोष साजरा करत होते.

तरडोलीत तब्बल 222 कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप

मात्र आंनद साजरा करताना क्रिकेट प्रेमींना वाहतूक कोंडी झाल्याचे भान राहिले नव्हते. बराच वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यावेळी पोलिसांनी त्या अतिउत्साही क्रिकेट प्रेमींवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. मात्र या लाठीचार्जचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

One Comment on “पुण्यात पोलिसांचा लाठीचार्जचा व्हिडीओ आला समोर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *