खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचा! दोन्ही गटाचे आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल

मुंबई, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते संदर्भातील निकालाचे वाचन केले आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालात राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी हा अजित पवार गटाचा पक्ष असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा एकही आमदार अपात्र ठरला नाही.

https://x.com/ANI/status/1758097022660280539?s=20

https://x.com/ANI/status/1758102779321565313?s=20

बहुमताच्या जोरावर निर्णय दिला: नार्वेकर 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचाच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे बहुमताच्या आधारावर हा निकाल देण्यात आल्याचे राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच त्यांनी दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवले आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादीच्या याचिकांवर निकाल दिल्याचे पाहायला मिळत आहे.

याआधी निवडणूक आयोगाने अजित गटाच्या बाजूने निकाल दिला होता

तत्पूर्वी, 5 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणून घोषित केले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले होते. त्यामुळे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. शरद पवार गटाला अद्याप पक्षचिन्ह मिळालेले नाही. तर शरद पवार गटाला लवकरच नवे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *