उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरला मंदिरात!

बारामती, 30 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावच्या हद्दीत निरा बारामती रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या काळुबाई मंदिराच्या शेडमध्ये 29 नोव्हेंबर 2022 रोजी रात्रीच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरला. ट्रॅक्टर ट्रॉलीची डिक्स तुटल्याने सदर अपघात झाला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

मात्र रस्त्यावर दोन ट्रॉल्या उभ्या असल्याने रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक संत गतीने सुरू होती. रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्याने इतर वाहने प्रवास करताना अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र प्रशासनाने तत्परता दाखवत दोन्ही ट्रॉल्या व ऊस बाजूला हटवत वाहतूक सुरळीत करून दिली.

पुणे विभागात बहुविद्याशाखीय केंद्र कार्यान्वित होणार

3 Comments on “उसाने भरलेला ट्रॅक्टर शिरला मंदिरात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *