दौंड, 17 ऑक्टोबरः दौंड शहरातील सहकार चौकात पाटबंधारे विभागाच्या कॉलनीत एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 11 लाख 72 हजार 200 रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी, 14 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री घडली.
भरधाव शिवशाहीची सात वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रिया रणसिंग (रा-एरीगेशन कॉलनी पिरॅमीड हॉस्पीटल शेजारी सहकार चौक) यांच्या नातेवाईकांच्या घरी डोहाळे जेवण असल्याने त्या कुटुंबियांसह घर बंद करून गेल्या होत्या. या बंद असलेल्या घरात अज्ञात चोरांनी घराचे पाठीमागील बाजुस असलेल्या बाथरुमच्या खिडकीची जाळी उचकटुन आत प्रवेश करुन 10 लाख 72 हजार 200 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान किमंतीच्या वस्तू चोरून नेल्या.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रोहित पवारांची हजेरी
याबाबत प्रिया रणसिंग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही चोरी विकी रणसिंग ( रा. जनता कॉलनी ता. दौंड, जि. पुणे) याने केली असल्याचा संशय प्रिया रणसिंग यांनी आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
One Comment on “अबब! डोहाळे जेवन पडलं तब्बल 11 लाखांना!”