नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली; 2 जण जखमी, एक बेपत्ता

नवी मुंबई, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) नवी मुंबईतील शाहबाज परिसरातील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या 52 जणांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 13 बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही इमारत 10 वर्षे जुनी आहे. त्यामुळे ही इमारत का कोसळली? याचा तपास सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. अशी माहिती नवी मुंबई पालिका आयुक्त केलास शिंदे यांनी दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1817052908434694298?s=19

https://x.com/AHindinews/status/1817030580678115839?s=19

52 लोकांना सुरक्षित बाहेर काढले

तत्पूर्वी, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी याठिकाणी बचावकार्य सुरू केले. यावेळी त्यांनी 52 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. तसेच ढिगाऱ्यात अडकलेल्या 2 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तर एकजण बेपत्ता आहे. तो ढिगार्‍याखाली गाडला गेला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

https://x.com/ANI/status/1817120293363785803?s=19

ढिगारा हटवण्याचे काम सुरू

ही इमारत तीन मजली असून, या इमारतीत 13 फ्लॅट होते. सध्या याठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्य करत आहेत. जवळपास सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. महानगरपालिका या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यानुसार या संदर्भात कारवाई केली जाईल, असे नवी मुंबई झोन 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी म्हटले आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1817083578775196158?s=19

मुख्यमंत्र्यांनी घेतली दुर्घटनेची माहिती

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहबाज परिसरातील या दुर्घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेची सर्व माहिती आयुक्तांकडून माहिती घेतली. या इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *