पुणे, 19 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील नवी पेठ परिसरातील एका लायब्ररीला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.19) सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या आगीत ही लायब्ररी जळून खाक झाली आहे. यातील फर्निचर, कॉम्प्युटर आणि पुस्तके पूर्णपणे जळाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम करून ही आग विझविली.
https://x.com/ANI/status/1847486453473038361?t=SbrX1MdrVWl7FF17SRBWkA&s=19
अग्निशमन दलाने दिली माहिती
नवी पेठ परिसरातील ध्रुवतारा नावाच्या या लायब्ररीला आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची बातमी कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी चार गाड्या आणि दोन पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने ही आग पूर्णपणे विझविली. यामध्ये कोणतीही जीवितहानी वा जखमी झाले नाही. या आगीमुळे लायब्ररीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामध्ये फर्निचर, कॉम्प्युटर आणि पुस्तके जळून खाक झाली आहेत.
या आगीचे नेमके कारण अद्याप सांगता येत नाही. परंतु, काल रात्री या लायब्ररीमध्ये पेस्ट कंट्रोल केल्याचे सामोर आले आहे. पण या आगीबाबत आणखी माहिती घेण्यात येईल. सध्या या आगीचा तपास सुरू आहे. तीन मजली इमारतीमध्ये ही लायब्ररी असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेवेळी लायब्ररीमध्ये कोणीही नव्हते, अशी माहिती पुणे शहर अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी दिली.