नागपुरातील एका कंपनीत भीषण स्फोट! 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) नागपुरात स्फोटके बनवण्यात येणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील चामुण्डा एक्सप्लोझिव्ह कंपनीत आज दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यानंतर ही आग वाढत गेली. या आगीमुळे कंपनीतील कामगार होरपळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1801225802089988212?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1801197927693799868?s=19

स्फोटाचे कारण अस्पष्ट

या स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. याचा सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी तपास चालू आहे. आमचे पोलीस पथक, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर असून कारवाई सुरू आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंघल यांनी यावेळी दिली. तर जखमींना नागपूर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

फडणवीसांकडून शोक व्यक्त

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ही घटना अत्यंत दुःखद असून, मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांशी मी संपर्कात असून, जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *