दारूच्या बिलावरून हॉटेलमध्ये तुफान राडा; मारहाणीचा व्हिडिओ आला समोर!

सोलापूर/ बार्शी, 24 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील एस.के. पॅलेस हॉटेलमध्ये दारूचे बिल न भरल्यामुळे वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सदर वादाचे रुपांतर काही क्षणात तुफान हाणामारीत झाले आहे. या हाणामारीत हॉटेलच्या मॅनेजरवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर हॉटेलचे वेटर विकी शंकर कदम याच्या फिर्यादीवरून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदर घटना 23 जुलै रोजी सायंकाळी 5.45 सुमारास घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

पहा व्हिडिओ –

 

हॉटेल मॅनेजरला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, काल, मंगळवारी (दि. 23 जुलै) सायंकाळी 5.45 च्या सुमारास एस. के. पॅलेस हॉटेलमध्ये मस्के आणि निखील ननवरे हे दोघे आले होते. दारू पिल्यानंतर बिल भरण्यास त्यांनी नकार दिला आणि मॅनेजर महेश अंधारेला धमकी दिली की, हॉटेल चालू ठेवायचे असल्यास 20 हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. यानंतर, सागर ओव्होळ आणि समर्थ वस्तादला बोलावून महेश अंधारेला मारहाण करण्यात आली. सागर ओव्होळ याने दारूच्या काचेच्या बाटल्यांनी मॅनेजरच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महेश अंधारे गंभीर जखमी झाला असून हल्ल्यामुळे हॉटेलचे अंदाजे 20 हजारांचे नुकसान झाले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे हे करीत आहे. या आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 च्या कलम 109(1), 115(2), 324(4), 308(3), 3(5) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *