इंदापूर, 8 जूनः (प्रतिनिधी- सम्राट गायकवाड) नांदेड तालुक्यातील बोंडार हवेली या गावी बौद्ध समाजातील तरूण कार्यकर्ता अक्षय भालेराव याची जातीय द्वेषातून निघृणपणे चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून सदर खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आले.
मुर्टीत भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न
यासह अक्षय भालेराव याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 लाख रूपये देण्यात यावे, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी देवुन शहराच्या ठिकाणी घर देण्यात यावे, आदी मागण्याही निवेदनात करण्यात आले आहे.
बड्या मंडळींच्या अतिक्रमणाविरोधात प्रबुद्ध युवक संघटनेचे आंदोलन
सदर निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक इंदापूर यांना 7 जून 2023 रोजी देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
One Comment on “महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून प्रशासनाला निवेदन”