श्री छत्रपती विद्यालयात सेवानिवृत्तीपर विशेष कार्यक्रम संपन्न

बारामती, 29 मार्चः (प्रतिनिधीः बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे नुकताच सेवानिवृत्ती पर विशेष कार्यक्रम पार पडला. तानाजी नारायण माने यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तासगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ माने, सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय दरेकर सर, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य लालासाहेब नलवडे, आर. व्ही. जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टी. सी. कॉलेजच्या क्रीडांगणात वृक्षांची कत्तल; गुन्हा दाखल करण्याची मागणी

या कार्यक्रमाला मुर्टीच्या सरपंच मंगला खोमणे, स्थानिक कमिटी सदस्य नानासाहेब जगदाळे, उपसरपंच किरण जगदाळे, भाजप बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे, पत्रकार शरद भगत यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक काकडे डी.जी.सर व शिक्षक वृंद यांनी केले. सूत्रसंचालन सारिका तांबे मॅडम यांनी केले. या प्रसंगी सत्कार मूर्ती तानाजी माने सरांचा गावकऱ्यांकडून सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची नवीन कार्यकारिणी जाहीर

One Comment on “श्री छत्रपती विद्यालयात सेवानिवृत्तीपर विशेष कार्यक्रम संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *