डीपफेक प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती होणार

दिल्ली, 24 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेकचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. डीपफेक संदर्भात केंद्र सरकार आता सतर्क झाले आहे. सोशल मीडियावरील डीपफेक कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहे. हा अधिकारी डीपफेक प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात लोकांना मदत करेल, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज दिली आहे.

चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क

“आम्ही आज इंटरनेटच्या सर्व प्रमुख कंपन्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत डीपफेकच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार डीपफेक प्रकरणी तक्रार करण्यासाठी एक वेबसाईट तयार करणार आहे. या वेबसाईटवर तक्रार केल्यामुळे डीपफेकची प्रकरणे भारत सरकारच्या निदर्शनास आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वापराच्या अटी कायद्याचे पालन करण्यासाठी 7 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.” असे राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.

एस श्रीशांत विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्या डीपफेक व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारची काल एक बैठक पार पडली होती. त्यावेळी केंद्र सरकार यासंदर्भात नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली होती. तर डीपफेक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या व्यक्तींना 1 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

One Comment on “डीपफेक प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *