दौंड, 25 जानेवारीः दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी 2023 पासून टप्प्याटप्प्याने असे एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले. मोहन पवार, संगीता पवार, श्याम फुलवरे, राणी फुलवरे, रितेश फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा फुलवरे या सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. तसेच या घटनेनंतर उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे. सदर घटना ही आत्महत्या नसून नातेवाईकांनीच त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
बानपकडून सातवांना अभय आणि गरिबांना भय!
मोहन पवार हे खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील असून शामराव फुलवरे हे येळंब (ता. जि. बीड) येथील आहेत. सध्या हे सर्व जण काम धंद्यामुळे निघोज (ता. शिरूर) येथे रहात होते, अशी माहिती शामराव फुलवरे यांचे मेहुणे दीपक शिंदे यांनी दिली.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 100 टक्के निकाल
दरम्यान, मोहन पवारांचा मुलगा अमोल पवार हा चुलत भावासोबत म्हणजे धनंजय यांच्यासोबत तीन महिन्यांपूर्वी त्याचे सासुरवाडीला गेला आणि परतताना अपघातात धनंजय याचा मृत्यू झाला. ‘अमोलच्याच परिवारांनी करणी केली म्हणून धनंजय गेला’, असा संशय धनंजयच्या कुटुंबीयांना होता आणि याच संशयातून मोहन पवार यांचे कुटुंब संपवण्याचा प्लॅन करण्यात आला. या सर्वांची हत्या केल्यानंतर मृतदेह भीमा नदीत फेकण्यात आले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली होती.
3 Comments on “भीमा नदीमधील सामूहिक आत्महत्येत नवे वळण!”