पुण्यात जिवंत ग्रेनेड सापडले

पुणे, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील बाणेर परिसरात सध्या मेट्रोचे काम जलदगतीने सुरू आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाणेर येथे रस्त्यावर खोदकाम सुरू असताना तेथे एक जिवंत ग्रेनेड सापडले असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; 2 वैमानिक ठार

 

यावेळी त्यांनी बॉम्ब शोधक पथकाला तात्काळ याठिकाणी पाचारण केले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने हे जिवंत ग्रेनेड निकामी केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, बाणेर येथे मेट्रोच्या कामासाठी IISER या कंपनी जवळील रस्त्यावर खोदकाम करण्याचे काम सुरू होते. यावेळी हे खोदकाम करीत असताना तेथे एक जिवंत ग्रेनेड सापडले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने हे ग्रेनेड निकामी केले. त्यामुळे तेथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

अधिवेशनात पराभवाचा राग धरू नका, मोदींचा विरोधकांना टोला

दरम्यान, हे ग्रेनेड कोठून आले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे बाणेर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर हे निकामी केलेले ग्रेनेड पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेमुळे तेथील वाहतूक बराच वेळ ठप्प झाल्याची पाहायला मिळाली. या घटनेचा तपास सध्या चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत. त्यामुळे याठिकाणी हे जिवंत ग्रेनेड कसे आले? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.

One Comment on “पुण्यात जिवंत ग्रेनेड सापडले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *