कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात नाझरे धरणातून मोठा विसर्ग

नाझरे, 18 ऑक्टोबरः नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होत आहे. या येणार्‍या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. सध्या 35250 क्युसेक्स इतक्या दराने कर्‍हा नदीत विसर्ग चालू आहे.

अबब! डोहाळे जेवन पडलं तब्बल 11 लाखांना!

यामुळे नाझरे धरण प्रशासनाकडून आज, 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 5 च्या सुमारास 35250 क्युसेक्सने विसर्गास सुरुवात केली आहे. यामुळे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच कर्‍हा नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत, असे आवाहन नाझरे धरण शाखेचे शाखाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच नदी किनार्‍यावरील सखल भागातील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत.

One Comment on “कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात नाझरे धरणातून मोठा विसर्ग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *