बारामती, 25 नोव्हेंबरः(प्रतिनिधी-शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती अंतर्गत दीड वर्षापुर्वी रस्त्याच्या साइटपट्टीचे काम करण्यात आले होते. मात्र सदर काम पुर्ण न झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे उगवली आहे. यामुळे या रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य तयार झाले आहे.
काळा बाजारात विक्रीसाठी चालविलेल्या रेशनिंगवर कारवाई
सदर काटेरी झुडपांमुळे पादचाऱ्यांसह दुचाकी प्रवाशांनाही याचा त्रास होत आहे. तसेच भविष्यात काटेरी झुडपे चुकवताना एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित ठेकेदारांनी या ठिकाणी कामाचे फलक व अंदाजपत्रकेच्या रकमेचा फलक लावलेला नाही. यामुळे ठेकेदाराशी संपर्क करता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगत येत आहे.
मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून
One Comment on “मुर्टीच्या ‘या’ रस्त्यावर काटेरी झुडपांचे साम्राज्य”