पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, एकजण जखमी

पुणे, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात आज हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेत एक जण जखमी झाला असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेला व्यक्ती हा या हेलिकॉप्टरचा कॅप्टन असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या हेलिकॉप्टर मधून 4 जण प्रवास करीत होते. हे सर्वजण सुखरूप असल्याची प्राथमिक समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

https://x.com/ANI/status/1827285418292752793?s=19

हेलिकॉप्टरमध्ये 4 प्रवासी होते

दरम्यान, हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. ते हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यावेळी हे हेलिकॉप्टर अचानकपणे पौड परिसरातील एका गावाजवळ कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात हेलिकॉप्टरचा कॅप्टन जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातामुळे हेलिकॉप्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हे हेलिकॉप्टर खाली कोसळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचे अधिकृत कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर या अपघाताच्या तपास सध्या केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *