सोमेश्वर देवस्थानात पुजाऱ्यांच्या गटात तुफान हाणामारी!

बारामती, 19 जुलैः बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थानात आज, 19 जुलै रोजी, सकाळी पुजाऱ्यांच्या दोन गटात फ्री स्टाईलने तुफान हाणामारी झाली आहे. सदर हाणामारी ही देवस्थानच्या परिसरात दुकान जागेच्या वाटपावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

इंदापूरला लवकरच मिळणार खडकवासल्याचे पाणी

सध्या सोशल मीडियावर पुजाऱ्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. मात्र या संदर्भात अजूनही कोणतीच तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *