बारामती, 26 ऑक्टोबरः 14 ऑक्टोबर 1956 ला सम्राट अशोका विजयादशमी दिनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती घडवून आणली. रक्ताचा एकही थेंब न सांडता लाखो समाज बांधवांना या जगातील महान असा विज्ञानवादी बुद्ध धम्म दिला त्याला 67 वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून बौध्द युवक संघटना, बारामती यांच्या विद्यमाने बौद्ध समाजाचा भव्य मेळावा व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात ,अजय देहाडे, मंजुषा शिंदे यांचा प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 7500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
सदर मेळाव्याच्या कार्यक्रमास ना. संजय बनसोडे (क्रीडा मंत्री, महाराष्ट्र राज्य) दिलीप कांबळे (माजी समाज कल्याण मंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. बौद्ध समाजाच्या मेळाव्याचे आयोजन नवनाथ बल्लाळ (माजी उपनगराध्यक्ष, बानप), सचिन साबळे (प्रदेश सदस्य, भाजप), संजय भोसले (माजी सभापती पंचायत समिती, बारामती), अमोल वाघमारे, निलेश मोरे, अजित कांबळे, सुशांत जगताप, प्रा. मिलिंद कांबळे, देविदास गायकवाड, अक्षय शेलार, नितीन शेलार, गणपत शिंदे, किशोर सोनवणे, विक्रम थोरात, धीरज भोसले, सागर गायकवाड, सिद्धार्थ सोनवणे, विशाल गायकवाड, संकेत शिंदे, नाना लोंढे, सागर शीलवंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदावर्तेंविषयी शिंदे गटाच्या आमदारांचे वादग्रस्त विधान
सदर कार्यक्रम हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, इंदापूर रोड बारामती येथे 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे 4 थे वर्ष आहे. सर्व समाज बांधवांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन बौद्ध युवक संघटना, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
One Comment on “धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध समाजाचा भव्य मेळावा”