पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लोक हे गेल्या काही महिन्यांपासून बस स्टँड जवळील रस्त्यावरील फुटपाथ शेजारी हे लोक राहत आहेत. बस स्टँडजवळ दोन पुरुष हे मुलांना बळजबरीने घेऊन जात आहे. त्या मुलांची आई ही गरोदर आहे. सदर महिला ही आपल्या पतीला सोडून काही महिन्यांपूर्वी बारामतीत वास्तव्यास आली होती. सदर महिला ही एका व्यक्तीसोबत कऱ्हानदीच्या पुलाखाली रोडच्या कडेला राहत आहे. ही महिला भीक मागून उदारनिर्वाह करत आहे. दुसऱ्या व्यक्तीमुळे तिला दिवस गेले आहे. ज्यावेळी महिलेच्या पहिल्या पतीला ही बाब समजल्यानंतर तो बारामतीत दोन दिवसापूर्वी आला. महिलेच्या पहिल्या पती आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये दारूच्या नशेत मारामारी सुरू झाली. पहिला पती हा मुलांना घेऊन जात होता, मात्र दुसरा व्यक्ती त्याला तसे करण्यास विरोध करत होता. यामुळे आसपास बघ्यांची गर्दी उसळली होती.
सदर लोक हे रस्त्याच्या कडेला वास्तव्यास असून त्यांची आरोग्यासह मूलभूत राहण्याची सुविधा नसल्याने शहर पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतला. महिलेसह मुलांवर ते दोन्ही पुरुष ताबा मागत होते. मात्र त्यांच्यापासून त्यांना धोका होऊ शकतो, हे ओळखून शहर पोलिसांनी महिलेसह त्या चार मुलांना बारामतीमधील प्रेरणा वसतिगृहात अधिक्षीका संत मॅडम यांच्या परवानगीने दाखल केले. संबंधित महिला ही चारही मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसल्यास त्या मुलांना पुण्यातील बाल कल्याण समिती यांच्या समोर हजर करून त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. मात्र सदर महिलेने अजूनही परवानगी दिलेली नाही. सदर प्रकरण हे पत्रकार आणि पोलिसांच्या अतिशय संवेदनशीलपणे हाताळून गरोदर महिलेसह चार मुलांचे पुनर्वसन केले आहे. सदर कारवाई ही पीएसआय घोडके, पोलीस कर्मचारी कोळेकर यांनी केली आहे.