घाटकोपर येथे बेकादेशीरपणे होर्डिंग लावल्याप्रकरणी दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, 14 मे: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर परिसरात अंगावर लोखंडी होर्डिंग पडून 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच यामध्ये 74 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 32 जखमींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी हे होर्डिंग्ज लावणाऱ्या युगो कंपनीच्या मालकावर एफआयआरची नोंद केली आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असून ते लावणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1790322535705313452?s=19

बेकायदेशीरपणे होर्डिंग लावले

या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक निवेदन जारी करून हे होर्डिंग बेकायदेशीरपणे लावले असल्याचे म्हटले आहे. होर्डिंग्ज लावण्यापूर्वी संबंधित कंपनीने बीएमसीकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याप्रकरणी बीएमसीने होर्डिंग्ज लावणाऱ्या एजन्सीला नोटीस बजावली आहे. मुंबईत सध्या जास्तीत जास्त 40 स्क्वेअर फुट आकाराचे होर्डिंग लावण्यास परवानगी आहे. मात्र हे होर्डिंग जवळपास 120 स्क्वेअर फुट आकाराचे असल्याचे होते.

https://x.com/ANI/status/1790074204840214938

दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधित असलेल्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी हे होर्डिंग लावणाऱ्या युगो कंपनीचा मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध भादंविच्या कलम 304, 338, 337, 34 अन्वये मुंबईच्या पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. दरम्यान, सध्या हे होर्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज घाटकोपर मधील दुर्घटनास्थळाला भेट देवून बचावकार्याची केली पाहणी. यावेळी त्यांनी येथील परिस्थितीचा घेतला आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *