केरळ, 24 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज एस श्रीशांत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एस श्रीशांत याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. केरळ पोलीस ठाण्यात एस श्रीशांत आणि अन्य दोघांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यांच्याविरोधात केरळ मधील चुंडा कन्नापुरम येथील सरिश बालगोपालन नावाच्या व्यक्तीने तक्रार केली आहे. त्यांच्यावर कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमीच्या बांधकामासाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एस श्रीशांत, राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांच्या विरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
बारावीत बायोलॉजी विषय नसला तरीही डॉक्टर बनता येणार!
दरम्यान आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी माझ्याकडून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधण्यासाठी 25 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत एकूण 18.70 लाख रुपये घेतले. त्यासाठी या दोघांनी मला स्पोर्ट्स अकादमीत भागीदारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरच मी त्यांना हे पैसे दिले, असे सरिश बालगोपालन यांनी या तक्रारीत म्हटले आहे. तर या स्पोर्ट्स अकादमीत एस श्रीशांत देखील भागीदार आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा
एस श्रीशांतसाठी वाद ही काही नवी गोष्ट नाही. श्रीशांत यापूर्वी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2020 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावरील ही बंदी उठवली होती. तसेच आयपीएल मधील एका सामन्यानंतर श्रीशांत आणि हरभजन सिंग यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यावेळी हरभजन सिंगने श्रीशांतच्या कानाखाली लगावली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
One Comment on “एस श्रीशांत विरोधात गुन्हा दाखल”