काँग्रेस पक्षाविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

हैदराबाद, 10 मे: (विश्वजीत खाटमोडे) अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस पक्षाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादच्या शादनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नवनीत राणा या अडचणीत येण्याची शक्यता आहे. नवनीत राणा या काही दिवसांपूर्वी झहीराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बी. बी. पाटील यांच्या प्रचारासाठी झहीराबाद येथे आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करणे होय, असे वादग्रस्त वक्तव्य नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

https://x.com/ANI/status/1788835399357309268

गुन्हा दाखल!

याप्रकरणी निवडणूक ड्युटीवर असलेले निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्णा मोहन यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, शादनगर पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्या विरोधात आयपीसी कलम 188 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद मधील झहीराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बी. बी. पाटील यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या झहीराबाद येथे आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.

https://x.com/ANI/status/1787870858981024161

नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या?

“भाजप उमेदवार बी बी पाटील यांच्या प्रचारासाठी मी इथे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पारचा नारा दिला आहे. त्या 400 जागांमध्ये झहीराबादची एक जागा फिक्स असणार आहे. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करणे आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी मी झहीराबादला आले आहे,” असे वक्तव्य नवनीत राणा यांनी प्रचारादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *