जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

पुणे, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेक स्तरांतून निषेध करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/ANI/status/1743228790002811087?s=19

भाजपने तक्रार केली होती

आव्हाडांच्या विरोधात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 295 ए नुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे भाजपचे प्रमुख धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, काल भाजप आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी यावेळी पोलिसांकडे आव्हाड यांच्या अटकेची मागणी देखील केली होती.

वादग्रस्त वक्तव्य आणि खेद!

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मेळाव्यात प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “भगवान हा राम शाकाहारी नव्हता, तर तो मांसाहारी होता. 14 वर्षांपासून जंगलात राहणारा माणूस शाकाहारी अन्न शोधायला कुठे जाईल?” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता. “मी प्रभू श्रीरामांविषयी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. तसेच माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी खेद व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *