आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, 18 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील लोअर परळ येथे असलेल्या डेलिसल ब्रिजचे 16 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या पुलाच्या उद्घाटनासाठी त्यांनी परवानगी घेतली नसल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेने केला आहे.

टीम इंडियाने 2003 च्या पराभवाची परतफेड करावी; चाहत्यांची अपेक्षा

यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानूसार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते सुनील शिंदे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि सचिन अहिर यांच्या विरोधात मुंबईतील एनएम जोशी पोलिस ठाण्यात कलम 143, 149, 326 आणि 447 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे, तरीपण आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पुलाचे उद्घाटन केले असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना अटक होणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

तर यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे हा पूल जनतेसाठी खुला करण्यात आला असल्याचे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अशा पद्धतीने पुलाचे उद्घाटन करणे बेकायदेशीर आहे. महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन करून तेथील वाहतूक सुरू केली, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका

याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गट या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या हातात जेंव्हा सत्ता होती, तेंव्हा ते घरात बसून राहिले. घरात बसून विकासकामे होत नाहीत. डेलिसल ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र वेळेआधी या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असे शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटले आहे. तर या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणातील तणाव आणखी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

One Comment on “आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *