शिवाजी पार्कमधील बाचाबाची प्रकरण; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

मुंबई, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 16 नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरील बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ आले होते. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवले आणि ही तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी आता ठाकरे गटाच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र शिंदे गटाच्या एकापण कार्यकर्त्याला नोटीस बजावण्यात का आली नाही? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

पाहा विश्वचषकातील बक्षिसांची संपूर्ण यादी

दरम्यान, मुंबईच्या शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले होते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवाजी पार्क मैदानावर आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार गो बॅक अशा घोषणा दिल्या. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले. सुदैवाने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला नाही.

टीम इंडियाच्या सदैव पाठीशी – पंतप्रधान मोदी

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कोणीही गडबड करू नये. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी असे बोलणे आक्षेपार्ह आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी आलो आहोत. दिवंगत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचा अवमान कोणीही करू नये.”

2 Comments on “शिवाजी पार्कमधील बाचाबाची प्रकरण; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *