काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 14 नोव्हेंबरः बारामती येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने जिंकली आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा!

ब्लड बँकेत सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते. मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते. या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

गेले अनेक वर्षांपासुन काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने ब्लड बँकेच्या गरजेनुसार तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. ब्लड बँकेच्या विनंती वरून बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक व मंडळाचे अध्यक्ष सुरज सातव यांनी श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने तत्काळ रक्तदान शिबीर आयोजित करून 51 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बारामतीत सरकारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

यावेळी स्थानिक ब्लड बँकेत ब्लड बँकेच्या गरजेनुसार रक्तदान शिबीर आयोजित करावे, जेणेकरून त्याचा फायदा स्थानिक रुग्णांना होतो. श्री. काशिविश्वेश्वर तरुण मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे समाधन ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी व्यक्त केले.

One Comment on “काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *