पुण्यात 10 ते 12 गॅस सिलिंडरचा एकामागून एक स्फोट

पुणे, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यात 10 ते 12 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पुणे शहरातील विमान नगर परिसरातील सिम्बायोसिस कॉलेजजवळ घडली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. सध्या याठिकाणी अग्निशामक दलाचे जवान ही आग विझवत आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या याचा तपास केला जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1739960319462756713?s=19

दरम्यान, पुणे शहरातील विमान नगर परिसरातील सिम्बायोसिस कॉलेज जवळील एका अंडरस्ट्रक्शन साईटवर बेकायदेशीररीत्या 100 एलपीजी गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी 10 ते 12 सिलिंडरचा आज अचानकपणे एकामागून एक स्फोट झाला. या स्फोटांचा आवाज लांब पर्यंत पोहोचला होता. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.



यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून याठिकाणी लागलेली आग विझविली. या आगीत अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तर ही आग कशामुळे लागली? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तर या घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *