बारामती, 8 ऑक्टोबरः बारामती तालुकयातील माळेगावसह परिसरामध्ये लपून छपून सुरू असलेल्या मटका व्यवसायावर माळेगाव पोलिसांकडून 4 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या वेळी धाड टाकण्यात आली.
शेटफळ हवेली येथील आधार व एल्गार सभा दणक्यात
माळेगावमधील शिवनगर येथे राहत्या घराच्या आडोशाला मंगळवारी दिलीप शितोळे व अक्षय शितोळे हे पिता-पुत्र चोरून मोबाईल व्हॉट्सअॅप वरती मटक्याचे आकडे घेत असल्याची खबर माळेगाव पोलिसांना मिळाली.
यावेळी पोलिसांनी मंगळवारी रात्री 8. 30 च्या सुमारास टाकलेल्या धाडीमध्ये मटका घेताना दिलीप शितोळे, संतोष निंबाळकर, विश्वास ताकवले, मोहन खंडागळे, रज्जाक शेख व अक्षय शितोळे हे मटका घेताना आणि खेळताना आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत अक्षय शितोळे हा पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवर शितोळे यांनी मटक्याचे आकडे घेतलेले दिसत होते. सदर कारवाईत रोख रक्कम 29, 210 रुपये जप्त केली. तसेच संबंधितांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. या कारवाईमध्ये माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, सादिक सय्यद व नंदकुमार गव्हाणे यांनी सहभाग घेतला.