कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ!

बारामती, 18 ऑक्टोबरः नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात वेगाने पाणी साठा होत आहे. या पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत सध्या 35250 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात आज, 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळपासुनच मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

कऱ्हा नदी पात्रात वाढलेल्या पाण्यामुळे अंजणगाव, कऱ्हावागज, जळगाव क.प. येथील नदीकाठावरील तब्बल 20 कुटुंबांना स्थलांतरीत करण्याचे काम सकाळपासून सुरु आहे. तसेच पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविले आहे. कऱ्हा नदीत वाढत्या विसर्गामुळे मोरगाव-बारामती रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.

 

बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज, मंगळवारी सकाळी नदी काठच्या गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांच्या सूचना केल्या. तसेच तात्काळ नागरीकांना सुरक्षित जागेवर हालविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, नाझरे धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र कऱ्हा नदी पात्रात वाढलेलं पाणी पाहण्यासाठी बारामतीमधील कसबा पुलावर मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली आहे. सध्या कऱ्हा नदी पात्रात वाढलेल्या पाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात नाझरे धरणातून मोठा विसर्ग

 

One Comment on “कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *