पुणे, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आपल्या जबरदस्त फॉर्मात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथा विजय मिळवला आहे. काल (दि.19) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता. या विजयामुळे टीम इंडिया गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वाचन- प्रेरणा दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
परंतू, या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला होता.
https://twitter.com/BCCI/status/1714946038887563721?t=3pTIUL-sbVsTE0opstMlhw&s=19
आरक्षणाची यैसी की तैसी!
आता हार्दिक पांड्याच्या या दुखापतीविषयी एक नवीन अपडेट आली आहे. त्यानुसार हार्दिक येत्या 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. याबाबतची अधिकृत माहिती बीसीसीआय ने दिली आहे. या माहितीनुसार, हार्दिक पांड्या 22 ऑक्टोंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी धर्मशाला येथे जाणार नाही. त्याऐवजी तो आता बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये या दुखापतीकरिता वैद्यकीय मदत घेणार आहे. त्यानंतर तो थेट लखनऊ येथे भारतीय संघात सहभागी होईल, जिथे भारत इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे.
दरम्यान, या विश्वचषक स्पर्धेत हार्दिकने गोलंदाजीत एकूण 5 बळी घेतले आहेत. मात्र त्याचवेळी त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळालेली नाही.
One Comment on “टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिकच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट!”