बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवणाऱ्या तिघांना अटक

मुंबई, 20 जानेवारीः(विश्वजीत खाटमोडे) बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोवंडी येथील 2 अनधिकृत आधार केंद्रांवर छापा टाकून तिघांना अटक केली आहे. ते सरकारी मान्यताप्राप्त आधार केंद्र असल्याचे भासवून लोकांचे आधारकार्ड बनवत होते. तर याप्रकरणाचा सध्या मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1748357696448028767?s=19

एक वर्षापासून हे केंद्र चालवत होते!

दरम्यान, मुंबईतील गोवंडी परिसरात गेल्या वर्षभरापासून हे 2 अनधिकृत आधार केंद्र सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे या आरोपींकडून कोणी कोणी आधारकार्ड बनवले आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. तत्पूर्वी, गोवंडी परिसरात 2 अनधिकृत आधार केंद्र सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.

अशाप्रकारे आधारकार्ड बनवत होते

या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या युनिट 6 गुन्हे शाखेने या दोन्ही केंद्रांवर छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे ग्राहकांकडून कोणतेही कागदपत्र न घेता बनावट जन्म दाखला, बँक केवायसी, रेशन कार्ड, पाणी बिल आदी बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे आधार कार्ड बनवण्याचे काम करत होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *