बारामती/ जळगाव सुपे, 17 जानेवारीः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, पुणे जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत बारामती तालुक्यामधील जळगाव सुपे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्या हस्ते 14 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा महासचिव सतीश साळवे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, सचिव गोविंद कांबळे, संघटक सुजय रणदिवे, संघटक साईनाथ लोंढे, बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी जळगाव सुपे येथील चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीसह ढोल ताशांच्या गजरामध्ये जळगाव सुपे चौकामधून ते समाज मंदिरापर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांच पूजन करून आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष रामदास जगताप यांनी केले. यावेळी तालुका महासचिव सुरज कांबळे, उपाध्यक्ष संतोष कांबळे, संघटक मंगेश सोनवणे, संघटक आनंद जाधव तसेच संतोष मिसाळ, नंदू खरात, तालुका सहसचिव सागर जगताप व जळगाव सुपे शाखाध्यक्ष अभिषेक जगताप, उपाध्यक्ष विनायक जाधव, महासचिव अतुल जाधव, सचिव सौरभ जगताप, सहसचिव संदीप खंडाळे, संघटक विशाल जगताप, संघटक पांडुरंग खोमणे, संघटक सचिन खंडाळे, कोषाध्यक्ष दादासाहेब खंडाळे, प्रसिद्धीप्रमुख प्रतीक जगताप, संपर्कप्रमुख संदीप खंडाळे, तसेच बारामती तालुक्यातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व जळगाव सुपे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाखा अध्यक्ष अभिषेक जगताप यांनी जळगांव सुपे येथील ग्रामस्थांनचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम प्रामाणिकपणे सोडविण्याचे काम करेल, अशी ग्वाही दिली.
One Comment on “वंचितच्या शाखेचे जळगाव सुपे गावात उद्घाटन”