पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन; पीएम मोदींनी काळाराम मंदिर परिसरात केली स्वच्छता

नाशिक, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे वायूदलाच्या खास विमानाने नाशिक विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिकच्या निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1745685003932156031?s=19

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1745711405083533557?s=19

पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो!

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी श्री काळाराम मंदिराला भेट दिली. यावेळी श्री काळाराम मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

https://twitter.com/AHindinews/status/1745732040476258611?s=19

पंतप्रधानांनी श्री काळाराम मंदिराची स्वच्छता केली

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मंदिराची स्वच्छता केली. त्यानंतर मोदींनी श्री काळाराम मंदिरात भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अभंग आणि भावार्थ रामायणातील आठव्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे. यावेळी श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी तेथे उपस्थित असलेल्या महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी संवाद साधला.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1745741278929908174?s=19

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1745743506415751454?s=19

27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध राज्यातील आलेल्या युवक-युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हा महोत्सव 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे.

काळाराम मंदिरात जाऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे सौभाग्य लाभले: मोदी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला त्यांच्या भाषणातून संबोधित केले. “आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषाला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवी ऊर्जा दिली. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देतो” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “येत्या 22 जानेवारीपर्यंत देशातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन मी सर्वांना केले होते. आज मला काळाराम मंदिरात जाऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे सौभाग्य लाभले.” असेही ते यावेळी म्हणाले.

https://twitter.com/AHindinews/status/1745720900971078002?s=19

आजच्या पिढीसाठी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन महत्त्वाचे: पंतप्रधान

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या देशातील ऋषी-मुनींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी युवाशक्तीला नेहमीच सर्वोच्च ठेवले आहे. श्री अरबिंदो म्हणायचे की, भारताला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर भारतातील तरुणांना आपल्याला स्वतंत्र विचाराने पुढे जावे लागेल. स्वामी विवेकानंद असेही म्हणायचे की, भारताच्या आशा भारतातील तरुणांच्या चारित्र्यावर आणि बांधिलकीवर अवलंबून आहेत. श्री अरबिंदो आणि स्वामी विवेकानंदांचे हे मार्गदर्शन हे आज 2024 या वर्षात भारतातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे.”

https://twitter.com/AHindinews/status/1745722729909858390?s=19

नरेंद्र मोदींचा तरुणांना खास संदेश!

“काळ प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी नक्कीच देतो. भारतातील तरुणांसाठी ती सुवर्णसंधी आता आहे, हा अमरत्वाचा काळ आहे. आज तुम्हाला इतिहास घडवण्याची, इतिहासात तुमचे नाव नोंदवण्याची संधी आहे. असे काम करा की, पुढच्या शतकातील त्या काळातील पिढी तुमची आठवण ठेवेल. भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात तुम्ही तुमचे नाव सुवर्ण अक्षरात लिहू शकता, म्हणूनच मी तुम्हाला 21 व्या शतकातील भारताची सर्वात भाग्यवान पिढी मानतो.” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पुढे मोदी म्हणाले की, “देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण ज्या वेगाने मेरा युवा भारत संगठन मध्ये सामील होत आहेत, त्यामुळे मी खूप उत्साहित आहे. माय युथ इंडिया ऑर्गनायझेशनच्या स्थापनेनंतरचा हा पहिला युवा दिन आहे. या संस्थेला 75 दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि यामध्ये सुमारे 1.10 कोटी तरुणांनी आपली नावे नोंदवली आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *