बारामती, 29 जूनः बारामती शहरात एक रात्रीच्या मुक्कामानंतर आज, बुधवारी (29 जून) सकाळी संत तुकाराम महाराजाची पालखी ज्ञानबा-तुकारामच्या जयघोषात पुढील मार्गाकडे प्रस्थान केले. दरम्यान, आज सकाळी संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी बारामती शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या वेळी पालखीस आलेल्या भाविक भक्तांसाठी आमराई तालीमच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले. यंदाची पालखी ही दोन वर्षाच्या खंडानंतर आल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी व बारामतीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
सचिन शिंदे मित्र परिवारच्या वतीने वारकऱ्यांना चहा आणि नाश्ताचे वाटप
Related