मुंबईत एटीएसची मोठी कारवाई; सहा जणांना अटक

मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटने आज छापा टाकला. या कारवाईत त्यांनी 6 जणांना अटक केली आहे. यावेळी एटीएसने त्यांच्याकडून काही बंदुका आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सध्या या 6 जणांची कसून चौकशी केली जात आहे. तर हे अटक केलेले आरोपी कोणता कट रचत होते? याचा एटीएस तपास करणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1743911400140100086?s=19

3 बंदुका आणि 36 काडतुसे जप्त

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटने आज मुंबईतील बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली. यावेळी एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त केली. अटक करण्यात आलेले सर्वजण दिल्लीचे रहिवासी आहेत. ते सर्वजण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत एका भाड्याच्या खोलीत रहात असल्याचे म्हटले जात आहे. तर या आरोपींनी ही हत्यारे कशासाठी आणली होती? ही हत्यारे त्यांनी कोठून खरेदी केली. ते सर्वजण मुंबईत कोणत्या कारणासाठी रहात होते? यांसारख्या अनेक गोष्टींची एटीएस चौकशी करणार आहे.

एटीएस तपास करणार!

तर ह्या आरोपींचा ही हत्यारे ठेवण्यामागे कोणता हेतू होता? हे या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तसेच अटक केलेल्या या सर्वांचा दहशतवादाशी काही संबंध आहे का? याचा देखील एटीएस तपास करणार आहे. तर हे आरोपी दिल्लीहून मुंबईत कशासाठी आले होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. तर सध्या मुंबई एटीएस या कटाचा तपास करण्यात व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *