कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी

कोरेगाव भीमा, 01 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज 206 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटे पासूनच अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी याठिकाणी येऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1741665272434745679?s=19

तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सकाळी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास मानवंदना दिली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा उपस्थित होते. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://twitter.com/VBAforIndia/status/1741651754713047272?s=19



1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथील पेरणे फाट्यावर इंग्रज आणि पेशवे यांच्यात ऐतिहासिक लढाई झाली होती. यामध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन स्टाँटन यांच्या नेतृत्वातील महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 25,000 सैनिकांचा पराभव केला होता. या लढाईत महार बटालियनच्या सैनिकांनी तब्बल 16 तास झुंज देऊन बलाढ्य पेशवाई सैन्यावर विजय मिळवला होता. त्यामुळे महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा येथे ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. त्यानंतर 1 जानेवारी रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट दिली होती. तेंव्हापासून भीम अनुयायांकडून दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *