राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

चंद्रपूर, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी, सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार रामदास आंबटकर, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरे, जिल्ह्याधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दुरसिंह चव्हाण, धावपटु हिमा दास, ललिता बाबर, बैडमिंटन पटू मालविका बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

https://twitter.com/mieknathshinde/status/1740017414421754090?s=19

या स्पर्धेत देशभरातून जवळपास 1 हजार 551 खेळाडू सहभागी झाले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सुरूवात देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंनी शिस्तबध्द पध्दतीने फ्लॅगमार्च करत त्यातून आपापल्या राज्याचे दर्शन घडविले. तसेच यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी पार पडले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1740076746240835688?s=19

राज्य सरकारने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ते या कार्यक्रमात बोलत होते. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्राधान्य दिले असून याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1740077683185487953?s=19

तसेच यावेळी मिशन ऑलिम्पिकची देखील घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, “खेलो इंडिया, फिट इंडिया, उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहेत. 2036 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजी यांचा जोरकसपणे पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांची प्रशासकीय चमू ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *