बर्गेवस्ती, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यभरात काल दत्त जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. तसेच काल दत्त जयंतीनिमित्त राज्यातील अनेक दत्त मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील निमसाखर जवळील बर्गेवस्ती येथील श्री दत्त अनघा देवी मंदिरात देखील काल दत्त जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बर्गेवस्ती येथील श्री दत्त अनघा देवी मंदिरात काल दुपारी दत्त जयंतीनिमित्त महापूजा करण्यात आली. तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री दत्त अनघा देवी मंदिरात काल सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद गावातील आणि बाहेरगावी दत्त भक्तांच्या सहकार्यातून ठेवण्यात आला होता. या महाप्रसादाचे हे पाचवे वर्ष होते.
या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी काल याठिकाणी गावातील आणि बाहेरगावी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये लहान मुले, महिला आणि पुरूषांचा समावेश होता. यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमात गावातील मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.