बारामती, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथील माई फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका गरजू विद्यार्थिनीला आर्थिक मदत करण्यात आली आहे. तेजस्विनी दत्तात्रय भिसे असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती बारामती तालुक्यातील कनेरी गावची रहिवासी आहे. ही मुलगी सध्या पुण्यातील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने, या विद्यार्थिनीच्या घरच्यांना तिची हॉस्टेलची फी भरणे शक्य नव्हते.
त्यामुळे या विद्यार्थिनीच्या वडिलांनी माई फॉउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष ऍड. वैभव काळे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी यावेळी वैभव काळे यांच्याकडे मुलीची फी भरण्यासाठी मदत देण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी वैभव काळे यांनी मान्य करीत त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वैभव काळे यांनी माई फोउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून मित्रपरिवार, सहकारी व देणगीदार यांना मदत करण्याचे आवाहन केले.
त्यानुसार, या सर्वांच्या मदतीतून सदर गरजू विद्यार्थिनीला आज 21,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. यावेळी माई फोउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष ऍड. वैभव काळे, श्री. गणेशशेठ जोजारे सराफ, श्री. धैर्यशील काळे साहेब, श्री गणेश पोमणे साहेब, ऍड. विवेक बेडके, श्री. ऋषिकेश काळे, ऍड. रियाज खान, श्री. मृगराज काळे, ऍड. बाबाजन शेख, श्री. युवराज जाधव व सर्वा संस्थेचे सहकारी उपस्थित होते.
तसेच यावेळी माई फोउंडेशन ट्रस्ट वतीने देणगीदार मित्रपरिवार व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी माई फोउंडेशनचे संस्थापक ऍड. वैभव काळे यांनी सदरची मदत ही माई फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरीब, असहाय्य लोकांसाठी मदतीचे किरण असणाऱ्या देणगीदार मित्रपरिवार व सहकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी श्री. गणेश शेठ जोजारे आणि श्री. धैर्यशील काळे यांनी माई फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि सदरील संस्थेला अशाच प्रकारचे समाज उपयोगी कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपण ही समाजाचे काही देणे लागतो ह्या जाणीवेतून सढळ हाताने अशा संस्थाना देणगी देत चाला, असे आवाहन त्यांनी यावेळी मोठमोठ्या व्यापारी, उद्योजक, राजकारणी व्यक्तींना केले आहे.